
गडचिरोली : लाल किल्ला बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांना मेणबत्ती लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, प्रकाश भांडेकर, सुनील देशमुख, सुरेश लोणारे, प्रफुल आंबोरकर, सुचिता कामडी, अश्विनी सुरज खोब्रागडे, पुरुषोत्तम शेंडे, निलेश सातपुते, राजू पुंडलिककर, शीतल आंबोरकर, देवानंद कामडी, महेंद्र वाघमारे, राजू साळवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी देशभक्तिपर घोषणा देत हुतात्म्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश लोणारे यांनी केले.
































