गडचिरोली शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष रत्नाकर राष्ट्रवादीत

गण्यारपवार यांनी केले स्वागत

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ सुरू आहे. त्यात गडचिरोली शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश रत्नाकर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले.

राकेश रत्नाकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 5, छत्रपती शाहूनगरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी पक्षात प्रवेश घेणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बेबी कुमरे, वैशाली सातपुते, अनिता डोईजड, राजू भारती, विनायक चिचघरे, पुरुषोत्तम सिडाम, किशोर सोनवाणे, पंढरी पाटील डोमळे, सुरेश श्रृंगारपवार, अमोल वोडेवार आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी पक्षाचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष शेमदेव चापले, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, गडचिरोली शहराध्यक्ष एजाज शेख, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष हुसेन शेख, जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.