भगवान बिरसा मुंडा यांची जयंती गडचिरोलीत श्रद्धाभावाने साजरी

भाजप कार्यालयात केले अभिवादन

गडचिरोली : आदिवासींचा अभिमान, जल–जंगल-जमीनीच्या हक्कांचे प्रेरणास्थान आणि संघर्षाचे प्रतीक असलेले जननायक भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात श्रद्धा, आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली.

या जयंती कार्यक्रमात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांनीही पुजन करून अभिवादन केले. ज्या तत्त्वांसाठी व मूल्यांसाठी बिरसा मुंडा यांनी संघर्ष केला, त्या आदिवासी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी मा.खा.डॅा.नेते यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला मा.आ.डॉ.देवराव होळी, मा.आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, कि.मो. प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, आदिवासी आघाडीचे डॉ.नितीन कोडवते, ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, माजी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, संजय बारापात्रे, मंगेश रणदिवे, अभिजित कोरडे, आशिष कोडापे, निखिल चरडे, आशिष रोहनकर, सोमेश्वर धकाते यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचे स्मरण करत, त्यांच्या आदर्श व विचारांना अनुसरून समाजहित, विकास आणि आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा या कार्यक्रमात घेण्यात आली.