देसाईगंज : वडसा रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी एका सफाई कर्मचाऱ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. रोशन किसन सहारे रा.रावणवाडी, असे मृत इसमाचे नाव आहे. सहारे हे देसाईगंज नगर परिषदेत सफाई कर्मचारी होते.
प्राप्त माहितीनुसार, सहारे हे नेहमीप्रमाणे रूळ ओलांडून पलिकडे जात होते. मात्र त्याचवेळी आलेल्या सुपरफास्ट रेल्वेगाडीचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे रेल्वेगाडीची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
स्थानकापासून थोड्याच अंतरावर ब्रह्मपुरी मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळ दुपारी 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
































