अभिनेत्री अंकिता लोखंडेसह भाजप उमेदवारांचा गडचिरोलीत रोड-शो

रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत

गडचिरोली : नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना रविवारी (दि.30) भारतीय जनता पक्षातर्फे अभिनेत्री अंकिता लोखंडे (‘पवित्र रिश्ता’ फेम) आणि उमेदवारांच्या रोड-शो चे आयोजन केले होते.

शहरातील भाजपा कार्यालयापासून गांधी चौक, सराफा लाईन, बाजार रोड, हनुमान मंदिर, तेली मोहल्ला, वंजारी मोहल्ला, धानोरा मेन रोड, कॅम्प एरिया, रामनगर, रेड्डी गोडाऊन चौक ते चामोर्शी रोडवरील भाजपा कार्यालयापर्यत झालेल्या या रोड-शो ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी जल्लोष करत स्वागत केले.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अॅड.प्रणोती निंबोरकर, तसेच सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या या रोड शो मध्ये भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, निवडणूक प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, डॉ.भारत खटी, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.