गंभीर आजाराने ग्रस्त नागरिकास धर्मरावबाबांकडून आर्थिक मदत

पुल्लीवार कुटुंबाला मिळाला दिलासा

अहेरी : तालुक्यातील बोरी गावातील रहिवासी विजय शंकर पुल्लीवार हे गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी निग्रहाने लढा देत आहेत. उपचारांचा प्रचंड खर्च, औषधोपचारातील वाढती आर्थिक गरज आणि वैद्यकीय प्रक्रियांचा भार यामुळे पुल्लीवार यांचे कुटुंब अडचणीत आले होते. ही परिस्थिती ओळखून आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.

सामाजिक दायित्वाची परंपरा जपणाऱ्या आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारामुळे पुल्लीवार यांच्या उपचारांसाठीचा हातभार लागला. या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून पुढील उपचारांबाबत नव्याने आशा निर्माण झाली आहे.

मान्यवरांनी दिले मानसिक बळ

या मदतकार्याच्या वेळी स्थानिक पातळीवर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे पुल्लीवार कुटुंबाला मानसिक बळ मिळाले. तसेच सामाजिक स्तरावर एकजुटीचा सुंदर संदेशही पोहोचला.
यावेळी राजपूर पॅचचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य सुरेश गंगाधरीवार, बोरीचे उपसरपंच पराग ओलालवार, नितीन गुंडावार, नरेश शेंडे, दिलीप सोनटक्के, अखिल कोलपाकवार आदींनी पुल्लीवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपचारांच्या काळात आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यामुळे पुल्लीवार कुटुंबियांना मानसिक आधार मिळाला.