राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत आश्रमशाळेच्या पियुषला कास्य

ज्युनिअर गटात मिळाले यश

गडचिरोली : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व वाशिम जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या 22 व्या ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेचा पियूष बाबूराव मट्टामी याने इंडियन राउंड प्रकारात सांघिक कास्यपदक पटकावले.

4 ते 6 डिसेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे सदर स्पर्धा पार पडल्या. या यशाबद्दल पियुष मट्टामी याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव, सहायक प्रकल्प अधिकारी वहीद शेख,
डॉ.प्रभु सादमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, श्रीराज बदोले, नाजूक उईके, सुप्रसिद्ध बडकेलवार, गड़चिरोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव डॉ.श्याम कोरडे, आर्चरी प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक रोशन सोळंके, कौमुदी श्रीरामवार, हिमालय शेरखी, अधीक्षक देविदास चोपडे, अधीक्षिका निमा राठोड, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.