गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज (दि.10) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून महिला जागृती व कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठासमोरील वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिकेसमोरील पटांगणावर दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, तर उद्घाटक म्हणून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, सहउद्घाटक मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, उपाध्यक्ष लक्ष्मी कन्नाके, सचिव तेजस्विनी भज्जे व इतर पदाधिकारी राहतील.
गडचिरोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत काम करण्याची इच्छा आहे त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्ष जाहेदा शेख, प्रसिद्धी प्रमुख पल्लवी आत्राम, गडचिरोली तालुका उपाध्यक्ष पूनम हेमके. शहराध्यक्ष स्नेहल मेश्राम, शहर उपाध्यक्ष भूषणा खेडेकर, शहर सचिव राणी गोपशेट्टीवार, शहर प्रवक्ता शीतल मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
































