आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयकपदी कुसुम अलाम

तेलंगणाची दिली जबाबदारी

गडचिरोली : जिल्ह्यातील साहित्यिक, विचारवंत, माजी जि.प. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आदिवासी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार डॉ.विक्रांत भुरिया यांच्या नेतृत्वाखाली व एससी-एसटी-ओबीसी विभागाचे प्रमुख के.राजू यांच्या मार्गदर्शनात ही निवड करण्यात आली.

कुसुम अलाम यांच्या आदिवासींची सुरक्षा, स्वाभिमान व विकासासाठी करण्यात येत असलेल्या कामाची ही पावती असल्याचे म्हटले जाते. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तेलंगणा राज्याची जबाबदारी सोपविली आहे. कुसुम अलाम यांच्या या नियुक्तीने आदिवासी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले.