शरद पवारांच्या वाढदिवसाला गडचिरोलीत विविध कार्यक्रम

गोरगरीबांना 536 ब्लँकेट वाटप

गडचिरोली : देशाच्या राजकारणातील वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या सूचनेनुसार विविध सामाजिक कार्यक्रम पार पडले.

त्यात अतिदुर्गम भागातील मौजा (माडे मुधोली) येथे आदिवासी, मागसवर्गीय गोरगरीब स्त्रियांना 536 ब्लँकेट्स वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा चामोर्शी नगर पंचायतचे नगरसेवक अमोल गण्यारपवार, विकास तांदूळ गिरणी घोटचे अध्यक्ष करण गण्यारपवार, माजी जि.प.सदस्य राजू आत्राम, सेवादलाचे अध्यक्ष प्रभाकर भेंडारे, गुलाब धोती, माजी पं.स.सदस्य सुरेश परसोडे, मधुकर चिंतलवार (माजी सरपंच, मुरखळा चक), नरेंद्र जुवारे, विनोद शेंगर (उपसरपंच, आमगाव), पंकज देलकर, प्रभाकर भेंडारे, अंतकला मडावी, अजिंक्य गण्यारपवार असे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच आजूबाजूच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे सर्व आजूबाजूच्या गावातील नागरिक व सर्वसामान्य नागरिक, तसेच ज्यांना या कार्यक्रमाचा लाभ मिळाला अशांकडून या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले.