गडचिरोली : हैदराबाद येथील फिक्कीच्या कन्व्हर्शन हॉलमध्ये जी.एच.आर.टी. इंटरनॅशनल इंडिया, संलग्नित नीती आयोग भारत सरकार, एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, युनायटेड नेशन ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर भारत सरकारच्या वतीने रोशन मसराम यांना मानद डॉक्टरेट उपाधीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुषमा मुपीट्टी, ब्रँड अँबेसिडर ऑफ बायो डायव्हर्सिटी बोर्ड तेलंगणा, एच.आर. रहमान (जीएचटीआर इंडिया), रवी मल्लू (खासदार तेलंगणा), मुजीबुर रहमान (कार्यवाहक, महावाणिज्य दूत अफगाणिस्तान), डॉ.बी.पी.संमेन परेरा (श्रीलंका), डॉ.टी.अरुल राज (शिक्षणतज्ञ, तामिळनाडू), डॉ.आयझॅक जान जोसेफ (यंग नॅशनल आयकॉन ऑफ द इयर, केरळ), डॉ.विजयानंद साळवे (उद्योगपती, एक्सिम सल्लागार महाराष्ट्र) आदी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक राज्यातील आपल्या क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्यांना मानद डॉक्टरेट उपाधी बहाल करण्यात आली. रोशन मसराम हे उच्चशिक्षित असून आदिवासी भागात गेल्या 21 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात राहून आपले कार्य पार पाडत आहेत. वर्ष 2025 मध्ये एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने आपला वेंडर पाठवून मसराम यांच्या कार्याची तपासणी केली.
नैराश्यातून आशेकडे नेऊन जीवन जगण्यास प्रवृत्त करणे, मानसिक आरोग्य सुधारणा, रक्तदान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धेपासून लोकांना दूर करून पॉझिटिव्ह ऊर्जा (श्रद्धा), युवकांना आत्मिक बळ, स्त्रियांना न्याय हक्क जागृती, असे विविध मानवतावादी कार्य सक्षमरित्या पार पाडल्यामुळे त्यांच्या भरीव कामगिरीची चाचपणी करून रोशन मसराम यांना “मानद डॉक्टरेट”ने सन्मानित करण्यात आले.
































