‘प्रकल्प महादेव’अंतर्गत दोन फुटबॅालपटूंची राज्यस्तरावर झेप

चयन व सुहाना मंडल यांची निवड

गडचिरोली : मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित महादेवा प्रोजेक्टअंतर्गत राज्यस्तरीय फुटबॉल खेळासाठी आयोजित निवड चाचणीत गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात 14 वर्षाखालील गटात चयन जगन्नाथ मंडल आणि मुलींमधून सुहाना सुनील मंडल यांचा समावेश आहे.

चयन हा रविंद्रनाथ टागोर माध्यमिक विद्यालय भवानीपूर, तालुका मुलचेरा येथील वर्ग आठवीचा विद्यार्थी आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबईच्या मैदानात ही निवड झाली. महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॅार ट्रान्सफॅार्मेशन यांच्या वतीने प्रकल्प महादेव चालविला जातो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.

या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल हकीम, शाहीन हकीम, विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एस.सरकार व सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.