‘सुशासन सप्ताहा’निमित्त महसूल शिबिराचे आयोजन

अमिर्झात विविध दाखल्यांचे वाटप

गडचिरोली : केंद्र शासनाच्या ‘सुशासन सप्ताह’ उपक्रमांतर्गत मौजा अमिर्झा येथे मंगळवारी, (दि.23) महसूल व कृषी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांना प्रलंबित असलेले विविध दाखले, सात-बारा आणि शासनाच्या योजनांचे लाभ मिळवून देत सुशासनाचा वस्तुपाठ सादर करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोलीचे तहसीलदार सागर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अमिर्झाचे सरपंच संदीप नामदेव भैसारे, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी सुप्रिया कळमकर, नायब तहसीलदार चंदू प्रधान, मंडळ अधिकारी पी.एम.धात्रक, तसेच महसूल अधिकारी व्ही.व्ही. बांडे, एम.बी.गेडाम, एस.व्ही.कोवे, व्ही.एस.कावटी
आदी उपस्थित होते.

शिबिरातील तक्रारी आणि त्यांचे स्वरूप

या शिबिरादरम्यान विविध विभागांच्या कामांबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रारी दाखल केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने महसूल विभाग, निराधार योजना, नुकसान भरपाई व कृषी विभाग, ग्रामपंचायत व रोहयो संबंधी तक्रारी नागरिकांनी मांडल्या. त्या तक्रारींची दखल घेण्यात आली.