गडचिरोली : गडचिरोली प्रेस क्लबच्या वार्षिक सभेत नवी कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद उमरे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी युवा राष्ट्रदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी शेमदेव चाफले, तर उपाध्यक्ष पदावर दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी रूपराज वाकोडे यांची निवड करण्यात आली.
प्रेस क्लब भवनात पार पडलेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रेस क्लबची नवी कार्यकारीणी गठीत करण्यात आली. इतर कार्यकारिणीत कोषाध्यक्ष पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, सहसचिव तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर काथवटे आणि कार्यकारिणी सदस्यांमध्ये हितवादचे जिल्हा प्रतिनिधी रोहिदास राऊत, लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, नवभारतचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश नगराळे, लोकशाही वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी निलेश पटले, आदिवासी माणूस पोर्टलचे सुरेश पद्मशाली, दै.गडचिरोली पत्रिकाचे विलास दशमुखे यांचा समावेश आहे. सहयोगी सदस्यांमध्ये नवराष्ट्रचे विनोद बदखल, साम टिव्हीचे गणेश शिंगाडे, टीव्ही 9 चे एम.डी.इरफान , पुढारी वृत्तवाहिनीचे आशिष अग्रवाल, एनडीटीव्ही मराठीचे मनीष रक्षमवार, डी.डी. न्यूजचे ओमप्रकाश चुनारकर, व्ही.एन.एक्स. न्यूजचे मनीष कासर्लावार, दै.अजिंक्य भारतचे नंदकिशोर पोटे, लोकशाही पोर्टलचे संदीप कांबळे आदींचा समावेश आहे.
मिलिंद उमरे मागील 23 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात असून नुकतेच त्यांना नानासाहेब परूळेकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारीतेसह ते महाराष्ट्रातील सर्वपरीचित निसर्ग अभ्यासक असून गडचिरोली वनविभागाच्या मानद वन्यजीव रक्षक पदावरही कार्यरत आहेत.
































