विज्ञान हा मानवी प्रगतीचा आधारस्तंभ आहे- कृष्णा गजबे

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना सन्मानित करताना मा.आ. कृष्णा गजबे.

देसाईंज : येथील आदर्श इंग्लिश हायस्कूलमध्ये दि.29, 30 व 31 डिसेंबर 2025 या कालावधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरणाने या प्रदर्शनाचा दि.31 डिसेंबरला समारोप झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माजी आमदार कृष्णा गजबे यांनी मानवी प्रगतीचा विज्ञान हा प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगत विज्ञानाचे महत्व सांगितले.

या प्रदर्शनात माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यालय देसाईगंज, द्वितीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, आणि तृतीय आदर्श इंग्लिश हायस्कूल देसाईगंज यांनी पटकावला. तसेच प्राथमिक गटातून जिल्हा परिषद शाळा कुरुड प्रथम, जिल्हा परिषद शाळा कोंढाळा द्वितीय, तर महात्मा गांधी विद्यालय देसाईगंज यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगराध्यक्ष लता सुंदरकर, नूतन शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष जगदीश शर्मा, सचिव मोतीलाल कुकरेजा, मार्गदर्शक प्रा.डॉ.श्रीराम गहाणे, नीलकंठ पोपटे, योगेश नाकतोडे, यशवंत टेंभुर्णे, एकनाथ पिल्लारे, आनंद गुरनुले, ज्ञानेश्वर बांडे, अंबादास आमनेर, मुरलीधर सुंदरकर, शिक्षिका नाकाडे, उईके, केळझरकर, तथा तालुकास्तरीय सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विशेष शिक्षक आणि सर्व विषय साधन व्यक्ती, गट साधन केंद्र पंचायत समिती देसाईगंज आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.