पारडीत कबड्डीचा जल्लोष, तर भिवापुरात ‘डे-नाईट’ची सांगता

मा.खा.डॅा.नेते यांची उपस्थिती

पारडीत सामन्यांच्या उद्घाटनप्रसंगी खेळाडूंशी हस्तांदोलन करताना मा.खा.डॅा.अशोक नेते
भिवापूर येथे विजेत्या संघाला बक्षीस देताना डॅा.अशोक नेते यांच्यासह इतर पाहुणे

गडचिरोली : तालुक्यातील मौजा पारडी (टोली कुपी) येथे युवा फ्रेंड्स ग्रुप कबड्डी क्लबच्या यांच्या वतीने आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. तर चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथे आयोजित दिवस-रात्र कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण डॅा.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

पारडी येथील उद्घाटन समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.नेते म्हणाले, “ग्रामीण भागात कबड्डीसारखा मातीतला खेळ मोठ्या उत्साहाने आयोजित केला जात आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. खेळाडूंनी राष्ट्रभावना, शिस्त आणि प्रामाणिकपणे खेळसंस्कृती जपत मैदानात उतरावे. विजय-पराजयापेक्षा खेळभावना अधिक महत्त्वाची आहे.”

या उद्घाटनप्रसंगी गावातील अग्निवीर म्हणून निवड झालेले जवान सुरज भोयर, तसेच पोलीस दलात नियुक्त झालेले जवान विक्की सुत्रपवार यांचा मा.खा.डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर डॉ.नेते यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार, डॉ.धम्मदीप बोदेले, भाजपा युवा नेते निखिल सुंदरकर, परमानंद पुन्नमवार, अॅड.मिलिंद लाकडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर गेडाम, जितेंद्र भांडेकर, प्रशांत कोटगले, संजय गडाटे, निखिल सहारे, अमोल गद्दमवार, दीपक ठाकरे, तुषार रामटेके, अरुण म्हशाखेत्री, सुनील भोयर, मंडळाध्यक्ष वेदांत लोंढे, गौरव भोयर, प्रविण गेडाम, धनराज गंडाटे यांच्यासह गावातील नागरिक, युवक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भिवापूरमध्ये डे–नाईट कबड्डी स्पर्धेचा समारोप

चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथे युवा संघर्ष कबड्डी क्लब, भिवापूर यांच्या वतीने आयोजित डे–नाईट मुलांच्या कबड्डी स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समारोपीय सोहळ्यात मा.खा.डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना, तसेच उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. खेळाडू, क्रीडाप्रेमी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या खेळाडूंचा उत्साह वाढविला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.नेते म्हणाले, “कबड्डी हा खेळ आज ग्रामीण भागात लोकप्रिय होत आहे. हा माझाही आवडता खेळ होत आहे. अनेक कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन व समारोपाला उपस्थित राहण्याचा मान मला मिळत आहे याचा आनंद आहे. अशा स्पर्धांमधून चांगले खेळाडू उदयास येतील, असा विश्वास आहे.”

या बक्षीस वितरण कार्यक्रमाला भाजप नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्यासह मंडळ अध्यक्ष महेश भोयर, धनंजय अलोने, साईनाथ टेकाम, लालू गेडाम, अपूर नैताम, सुमेध गव्हारे, तसेच भिवापूर गावातील नागरिक, क्रीडाप्रेमी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.