गडचिरोली : जैन कलार समाज महिला मंडळ गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्सच्या कमल-केशव सभागृहात शहरातील जैन कलार समाज भगिनींचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सांस्कृतिक कलागुणांची उधळण करण्यात आली. महिलांनी एकजूटता दाखवत हळदीकुंकू कार्यक्रमातून सामाजिक एकता व बांधिलकीचा संदेश दिला.
मकर संक्रांत हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने सुहासिनींनी वाण वितरित केले. तिळगुळ देऊन एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा व स्नेह व्यक्त करत संवाद साधला. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात धानोरा मार्ग व चामोर्शी मार्गाच्या भगिनींनी समूह नृत्य सादर केले. चंद्रपूर मार्ग व कॅम्प एरिया येथील भगिनींनी नाटिका सादर केल्या. मनोरंजनात्मक कार्यक्रम, एकल नृत्य, समूह नृत्य, उखाणे, गीत गायन, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर उपस्थित सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापना यासाठी माधुरी घुगरे, सरिता पेशने, खुशबू रणदिवे, पल्लवी समर्थ, अल्का रणदिवे, रक्षा खानोरकर, आदिती आदमने, वंदना वैरागडे, सुनिता गुरु, उषा डोर्लीकर, सुनिता बनपूरकर, रेखा वैरागडे, शिल्पा रणदिवे, राणी दुरुगकर या भगिनींनी पुढाकार घेतला.
उद्घाटन कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन शिल्पा आदमने, जिजा समर्थ, रेखा गुरुकर, अर्चना खानोरकर, मंगला हरडे, लीला भिवापुरे, कमल हरडे, शीला दुरुगकर, रेखा समर्थ, हर्षकला दडवे, कमल वैरागडे यांच्या हस्ते झाले. स्वागतगीत प्राची बनपूरकर व पूर्वाक्षी वैरागडे यांनी गायले. कार्यक्रमाचे संचालन सुरेखा रणदिवे तर आभार प्रदर्शन मनीषा हरडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी डॉ.पियुषा समर्थ, भाग्यश्री शेंडे, कल्पना लाड, स्नेहा शेंडे, कविता डवले, ज्योती समर्थ, भावना रणदिवे, ज्योती मुरकुटे, स्वाती कवठे, लता मुरकुटे, अरुणा लांजेकर, अर्चना भांडारकर, मंजुषा घुगरे, अल्का हरडे, वैशाली लाड, हर्षा हरडे, शारदा हजारे, माधुरी दहीकर, वर्षा शनिवारे, लक्ष्मी हजारे, रीना दडवे, विना शनिवारे, नमिता डांगे, स्वीटी समर्थ, रोशनी डांगे, जयश्री आष्टेकर, पल्लवी समर्थ आदींसह जैन कलार समाजातील भगिनींनी सहकार्य केले.
































