डॅा.अशोक नेते यांनी वाढले नेताजीनगरच्या पंगतीत जेवण

'भागवत धर्माची सेवा ही समाजसेवा'

चामोर्शी : तालुक्यातील नेताजी नगर येथे आयोजित पवित्र भागवत कीर्तन सप्ताहाला माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी भक्तिभावाने उपस्थिती लावली. या सप्ताहाच्या निमित्ताने त्यांनी भोजन पंगतीत भाविकांना स्वतः भोजन वाढून भोजनदानात सहभाग घेत समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

भागवत धर्माच्या माध्यमातून समाजात सद्भावना, संस्कार आणि एकात्मता निर्माण होते. अशा पवित्र कार्यात सहभागी होणे हे आपले भाग्य असल्याची भावना यावेळी डॉ.अशोक नेते यांनी व्यक्त केली. भक्ती, सेवा आणि समर्पण यांचा संगम म्हणजेच भागवत किर्तन सप्ताह आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भागवत सप्ताह कार्यक्रमास भाजपचे नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष अनिता रॅाय, किशोर कुंडू, विनोद किरमे यांच्यासह नेताजीनगर येथील ग्रामस्थ व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.