सहपालकमंत्री अॅड.जयस्वाल यांच्या हस्ते उद्या ध्वजवंदन

आज गडचिरोलीत मुक्कामी

गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे 26 जानेवारीला 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या गडचिरोली येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ध्वजवंदन करणार आहेत. त्यासाठी ना.जयस्वाल आज रविवारी संध्याकाळी गडचिरोलीत दाखल होत आहेत.

सायंकाळी 7 वाजता ना.जयस्वाल यांचे पोलीस विश्रामगृहात आगमन होईल. सायंकाळी 7.15 वाजता ते लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रात्री मुक्काम करतील. सोमवार, दि.27 जानेवारी रोजी सकाळी 9:15 वाजता पोलीस कवायत मैदानावर भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण आणि संचलन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण करतील.