‘त्या’ फुटलेल्या पाईपलाईनची नगरसेवकांनी घेतली दखल

समस्या दूर करण्यास सुरूवात

गडचिरोली : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषदेत विराजमान झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांनी आता शहरातील समस्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. शहराच्या प्रभाग क्र 7 मधील केमिस्ट भवनजवळची पाईपलाईन खूप दिवसांपासून फुटलेल्या अवस्थेत होती. याची तक्रार नागरिकांनी करून सुद्धा काहीच उपाययोजना केली जात नव्हती. दरम्यान नव्याने विराजमान नगरसेविका मेघा वरगंटीवार यांच्या ही समस्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्वरित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ही समस्या त्वरित सोडवण्याची सूचना केली.

प्रभाग क्र.7 मधील नाल्या कित्येक दिवसांपासून साफ केलेल्या नाहीत. रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपाची सफाई झालेली नाही, घंटागाडी नियमित येत नाही. या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात अशा सूचना वरगंटीवार यांनी दिल्या. याप्रसंगी स्वछता आणि पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी, नगरसेवक सागर निंबोरकर, सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत मोटघरे, मोहन वरगंटीवार उपस्थित होते.