गडचिरोली : संवेदनशिल मन आणि सामाजिक भान असेल तर सर्वसामान्य माणूसही असामान्य कार्य करू शकतो. याचा प्रत्यय दिला आहे गडचिरोली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस दाम्पत्याने. मुलांसाठी वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य विकत घेण्याची क्षमता नसलेल्या दुर्गम भागातील पालकांच्या ७५ मुलांचे शैक्षणिक पालकत्व या दाम्पत्याने घेतले आहे. या मुलांना चार वर्षापर्यंत लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य ते पुरविणार आहेत.
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील ७५ मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व
गडचिरोलीच्या पोलीस दाम्पत्याचे असेही दातृत्व