गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची गरज होती. पण आर्थिक अडचणीमुळे हे साहित्य विद्यार्थी घेऊ शकत नव्हते. त्याबाबत समजल्यानंतर माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील भाजप कार्यकर्त्याच्या माध्यमातून शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34 विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य पाठवले. त्यामध्ये टी-शर्ट, व्हॉलीबॉल, नेट आणि इतर काही वस्तू होत्या. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विविध क्षमता असूनही आदिवासी विद्यार्थी सुविधांअभावी मागे पडतात. क्रीडा साहित्य खरेदीसाठी पैसे नसल्याने खेळू शकत नसल्याची खंत विद्यार्थ्यांमध्ये होती. सिरोंचा येथील जगदंबा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची ही समस्या जाणून घेतली. त्यानंतर त्याबाबत माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना कळविले.
अम्ब्रिशराव आत्राम हे क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नेहमी मदत करत असतात आणि क्रीडा क्षेत्रात जाऊन त्यांनी आपले आयुष्य घडवण्यासाठी प्रेरणा देत असतात. यावेळीही त्याचा प्रत्यय आला. हे साहित्य देताना जगदंबा फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश कोत्तावडला, उपाध्यक्ष दिनेश सुनकरी, सचिव नागराजू मेडारपु, कोषाध्यक्ष शेखर मंबू, भाजपचे ज्येष्ठ नेते बापन्नाजी रंगूवार, तालुकाध्यक्ष दिलीप सेनिगारपू, जिल्हा उपाध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, सितापती गट्टू , मुरली मार्गोनी, रवींद्र आकुदरी, राजेश सुनकरी, शिरीष बेहेरी, रोहन तोटा, रवीकुमार पेयाला हे उपस्थित होते.