गडचिरोली : नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे रविवारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहे. दुपारी 2 वाजता जयहिंद लोकचळवळ संघटनेची आढावा बैठक गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात होणार आहे. आ.तांबे या बैठकीत संघटनेचा आढावा घेतील. यावेळी जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अतुल मल्लेलवार यांनी केले आहे.
