गडचिरोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्याच्या शहरी भागात विकसित भारत संकल्प यात्रा फिरणार आहे. त्याची सुरूवात रविवार, दि.२१ ला गडचिरोली शहरात गोकुळनगरातील कृषी उत्पन्न बाजार समिती चौकात होणार आहे. यावेळी खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
विकसित भारत संकल्प यात्रेची सुरूवात झाल्यानंतर ही यात्रा गोकुळ नगरातून लांझेडा वॅार्डात जाईल. दि.२२ ला सकाळी नगर पंचायत कार्यालय कोरची, दुपारी सांस्कृतिक भवन कोरची, दि.२३ ला सकाळी कृउबा समिती चौक आरमोरी, दुपारी सांस्कृतिक भवन देसाईगंज येथे, दि.२४ ला सकाळी सांस्कृतिक भवन कुरखेडा, तर दुपारी किसान भवन धानोरा, दि.२५ ला सकाळी सांस्कृतिक भवन चामोर्शी, तर दुपारी सांस्कृतिक भवन मुलचेरा, दि.२६ ला गोटुल भवन एटापल्ली, तर दुपारी बाजार चौक एटापल्ली, दि.२७ ला नगर पंचायत कार्यालय सिरोंचा आणि दि.२८ ला नगर पंचायत कार्यालय अहेरी येथे ही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचणार असल्याचे नगर पालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्तांनी कळविले.
गडचिरोलीतील उद्घाटन कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले आहे.