गडचिरोली : बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरिकांमध्ये ओळख आहे. पण गडचिरोलीतील अँक्सिस बँकेच्या शाखेने खातेधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्याचा नवा आदर्श ठेवला आहे.
गेल्या 7 फेब्रुवारी 2024 रोडी गडचिरोली पोलिस दलात कार्यरत कर्मचारी बहादूर पेन्टा सिडाम हे कर्तव्यावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले. सिडाम हे ॲक्सिस बँकेचे खातेदार होते. त्यामुळे ॲक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करत बहादूर सिडाम यांच्या पत्नी पुष्पा सिडाम यांना आर्थिक मदतीच्या रूपात 10 लाख रुपयांचा धनादेश अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश राजेंद्र बल्लालवार, उपशाखा व्यवस्थापक मुरलीधर नैताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.