गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांचा वाढदिवस आज विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा झाला. दिवसभर चाललेल्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक भावस्पर्शी कार्यक्रम गडचिरोलीतील मातोश्री वृद्धाश्रमात झाला. आपल्या सख्ख्या नातेवाईक आणि कुटुंबियांकडून दुर्लक्षित झालेल्या वृद्धांची अशोक नेते यांनी आस्थेने विचारपूस करून त्यांना कोणत्याही अडचणीसाठी काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, असा धीर देत ब्लॅकेटचे वाटप केले. या मायेच्या उबेने ते वृद्ध गहिवरून गेले.
सर्वप्रथम सेमाना देवस्थानात दर्शन घेऊन पुजापाठ आणि वृक्षारोपण करण्यात आले. यादरम्यान गडचिरोली शहरातील सेमाना रोड, गोकुलनगर येथील कैकाडी समाज मोहल्ला येथे महाप्रसादाचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नेते यांनी येथील नाल्या, रस्ते, पिण्याचे पाणी आणि इतर समस्या जाणून घेऊन त्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. मातोश्री वृद्धाश्रमात वृक्षारोपण करत वृद्धांना ब्लँकेटचे वाटप तसेच फळांचे वाटप करण्यात आले. आपल्यासोबत येऊन अशोक नेते यांनी आपला वाढदिवस साजरा केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. महिला व बाल रुग्णालय येथे माणुसकीचा घास म्हणून अन्नदान करण्यात आले. याशिवाय चामोर्शी आणि धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार नेते यांनी आपल्या वाढदिवसाला वृक्षारोपण करण्यास प्राधान्य दिले. निवासस्थानामागील खुल्या जागेतील कॅम्प एरियापासून सेमाना मंदिर, वृद्धाश्रम अशा बहुतांश ठिकाणी माजी खा.अशोक नेते यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरणाला पोषण वातावरण बनविण्यासाठी आपला वाटा उचलला.
या कार्यक्रमांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे,डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, मिना कोडाप, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, कामगार मोर्चाचे प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख निता व़़डेट्टीवार, भाजपचे अविनाश विश्रोजवार, श्याम वाढई, संजय बारापात्रे, गणेश तिवाडे, पल्लवी बारापात्रे, सीमा कन्नमवार,श्रीदेवी वरघंटे, रमेश नैताम, राकेश राचमलवार, तसेच मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते.