गडचिरोली : पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांसह नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांची खांदेपालट करत दुसऱ्या पोलीस स्टेशनला बदली केली आहे. त्यात सहा महिन्यांपूर्वी कुरखेडा येथे रुजू झालेले पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्याकडे गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. पो.निरीक्षक अरुण फेगडे यांच्याकडे विशेष शाखेची जबाबदारी देण्यात आली.
भामरागडचे पोलिस निरीक्षक संजय मोगले यांना गडचिरोलीतील नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले. अहेरी ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, भामरागड ठाण्यातून एपीआय शरद मेश्राम आणि मुलचेरा ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत असणारे एपीआय अशोक भापकर गडचिरोली पोलीस स्टेशनला येणार आहेत.
गडचिरोलीत अर्ज शाखेत कार्यरत एपीआय विद्या सुर्यवंशी यांना पोलीस अधीक्षकांच्या वाचक म्हणून जबाबदारी देण्यात आली. याशिवाय पीएसआय मनोज जासुद पिपली बुर्गीवरून आष्टीत, नव्याने रुजू झालेले पीएसआय सुधाकर कुमरे यांना गडचिरोलीतील नियंत्रण कक्षात, पीएसआय दीपक चव्हाण वांगेतुरीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनला, पीएसआय सागर मने कोठीवरून अहेरी पोलीस स्टेशनला, तर पीएसआय दीपक कुंभारे आत्मसमर्पण शाखेतून युएपीए सेल गडचिरोली येथे स्थानांतरित होत आहे. त्यांच्याकडे प्रबंधक शाखेचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे.