जात विचारणारे भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसने केला निषेध

चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन केल्याचा आरोप

गडचिरोली : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, हा मुद्दा लोकसभा अध्यक्षांसमोर रेटून धरला. यावेळी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना हिनविण्याच्या दृष्टीने भर सभागृहात खासदार राहुल गांधी यांना ‘तुमची जात काय?’ असा प्रश्न केला. बहुजनांच्या हितासाठी सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनणाऱ्या राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला, असा आरोप करत विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी यांचा भर संसदेमध्ये अपमान केल्याबद्द्ल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाकूर यांचा गुरूवारी गांधी चौकात निषेध करण्यात आला.

यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शंकर पाटील सालोटकर, माजी जि.प.उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, राजेश ठाकुर, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, कल्पना नंदेश्वर, वामन सावसाकडे, प्रमोद वैद्य, नामदेव मंडलवार, मंगला कोवे, प्रभाकर वासेकर, नंदू नरोटे, घनश्याम वाढई, रजनीकांत मोरघरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.