कसारीच्या हनुमान मंदिर मठात आमदार निधीतून होणाऱ्या बांधकामाचा शुभारंभ

आ.कृष्णा गजबे यांनी केले भूमिपूजन

देसाईगंज : तालुक्यातील मौजा कसारी येथील श्री हनुमान मंदिर मठात मंगळवार, दि.6 ऑगस्ट रोजी नव्याने मंजूर बांधकामाचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जागेची विधिवत पुजा करुन व कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला.

यावेळी पं.स.चे माजी सभापती गोपालजी उइके, सरपंच प्रदीप मडावी, उपसरपंच रवी काशीवार, मनोहर शेंडे, विसोराचे सरपंच रमेश कुथे, शंकरपूरचे सरपंच वालदे, तुळशीचे सरपंच चक्रधर नाकाडे, कोंढाळाच्या अपर्णा राऊत, विजय झंवर कुरखेडा, बलदेव भट्टकर, नगरसेवक रवी गोटफोडे, नबीर फुले, शामराव गायकवाड, मधुकर दुणेदार, वसंत कन्नाके, राघो कुंभारे, केशव सोनवाने, तेजराम बोरकर, श्रीराम वाघाडे व परिसरातील भाविक तथा कसारी येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

कुरुड येथे सी.सी. रोड बांधकामाची सुरूवात

मौजा कुरुड येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत आय.डी.बी.आय बँक ते रेखा मडावी यांच्या घरापर्यंत सी.सी.रोडचे बांधकाम केले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. जागेची विधिवत पूजा करुन, नारळ फोडून, कुदळ मारुन या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच ‌क्षितीज उके, सदस्य शंकर पारधी, विलास पिलारे, पलटुदास मडावी, रेखा मडावी, प्रतिमा उके यांच्यासह दौलत ठाकरे, नामदेव मिसार, गंगाधर खोब्रागडे, खापरे पाटील, जनार्दन नंदनवार, अतुल फटिंग व गावकरी उपस्थित होते.