आदिवासी दिनानिमित्त उद्या गडचिरोलीत मॅरेथॉन स्पर्धा, सहभागी व्हा- डॅा.होळी

मुले व मुलींसाठी वेगवेगळी बक्षिसे

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त उद्या, 9 ऑगस्टला गडचिरोलीत खुल्या मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आमि पुरूष अशा दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांसाठी वेगवेगळी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

आ.डॉ. देवराव होळी यांच्यासह आदिवासी संघटना व मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळी 7.30 वाजता स्पर्धेला सुरूवात होणार आहे. इंदिरा गांधी चौकातून चंद्रपूर मार्गावर स्पर्धक धावतील. यामध्ये मुलांसाठी 5 किलोमीटर, तर मुलींसाठी 3 किलोमीटर दौड पूर्ण करावी लागणार आहे.

मुलंच्या गटात प्रथम बक्षिस 7 हजार, दुसरे 6 हजार, तिसरे 5 हजार, चौथे 4 हजार, पाचवे 3 हजार, सहावे 2 हजार, तर मुलींच्या गटात गटासाठी प्रथम बक्षीस 5 हजार, दुसरे 4 हजार, तिसरे 3 हजार, चौथे 2 हजार आणि पाचवे 1 हजार रुपये आणि सोबत एक शिल्ड देण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये अधिकाधिक मुला-मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॅा.देवराव होळी यांचेसह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, बादल मडावी, कैलास गेडाम, भुषण मसराम, रुपेश सलामे, उमेश उईके आणि विविध आदिवासी संघटना व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.