ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आज ओबीसी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन

गडचिरोलीसह भामरागड, लाहेरीत कार्यक्रम

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम 15 ऑगस्ट रोजी गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते गडचिरोलीसह अहेरी आणि भामरागड तालुक्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहतील. विशेष म्हणजे बहुप्रतिक्षित ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

ना.आत्राम यांचा दौरा असा आहे. गुरुवार, दि.15 ऑगस्टला सकाळी 11.45 वाजता सुयोग निवासस्थान गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता इतर मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास आरमोरी रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता इतर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन कार्यक्रमास चामोर्शी रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी 2.30 वा. हेलिकॅाप्टरने अहेरीकडे प्रयाण. दुपारी 3 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार, दि.16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने लाहेरीकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते 11.40 यादरम्यान लाहेरी येथे नागरिकांसोबत संवाद बैठक. सकाळी 11.40 वाजता हेलिकॉप्टरने नारगुंडाकडे प्रयाण. सकाळी 11.45 ते दुपारी 12.45 दरम्यान नारगुंडा येथे नागरीकांसोबत संवाद बैठक. तर दुपारी 1.30 वा. ते दुपारी 3 दरम्यान भगवंतराव आश्रमशाळा, भामरागड येथे नागरीकांसमवेत संवाद बैठक घेऊन अहेरी येथे येतील.