गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरूवारी ठिकठिकाणी रोपट्यांचे वाटप करत आणि रोपटे लावून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाची सुरूवात माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, गडचिरोली विभाग प्रमुख प्रा.धर्मेंद्र मुनघाटे, नगर अध्यक्ष सुनीता साळवे, पूर्व प्रदेश मंत्री शक्ती केराम यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राचार्य अतुल बोराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आयटीआय कॉलेजमध्ये प्राचार्य बोरावार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय गांधी चौकातही रोपट्यांचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमासाठी गडचिरोली जिल्हा संयोजक अभिलाष कुनघाडकर, नगर मंत्री विकास बोदलकर, नगरसहमंत्री पुनम कुमरे, गौरव दरमडे, अमन सय्यद, कुंदन चापडे, करण चौधरी, जयेश ठाकरे, रोशन म्हस्के, कुंदन सापले, करण चौधरी, तुषार एल्गतवार, चेतन गुरनुले, अमोल निकोडे, गौरव गरमाडे, वैष्णवी नागोसे, आचल सावसाकडे, दिवेश्वरी नन्नावरे यांच्यासह अभाविपच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.