अतीदुर्गम गर्देवाडा पोलीस मदत केंद्रात आरोग्य मेळाव्याला उसळली गर्दी

तपासणीसह आरोग्य कार्ड काढून दिले

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या गर्देवाडा पोलीस मदत केंद्रात शुक्रवार, दि.6 रोजी आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी विविध आजारांच्या तपासणीसाठी नागरिकांचे रक्तनमुने घेऊन अनेकांना आभा हे आरोग्य कार्डही काढून देण्यात आले. विशेष म्हणजे या आरोग्य मेळाव्याला गर्देवाडासह परिसरातील गावकऱ्यांनीही हजेरी लावली होती.

पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश (अहेरी) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजनकर यांच्या नेतृत्वात हा मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्याला प्रामुख्याने सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक जितेंदर सिंग, गर्देवाडाचे प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक गजानन साखरे, संग्राम अहिरे, देवकुळे (SRPF), गट्टाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अंकुश वाढई, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हर्षद गावंडे, वैशाली नरोटी (CHO गर्देवाडा), एस.एल.चव्हाण (आरोग्य सहाय्यक), गौरी हेडो (आरोग्य साहाय्यिका ), पुष्पलता आलाम (आरोग्य सेविका), नामदेव वासेकर व लोहित कारपेत (आरोग्य कर्मचारी), तसेच सुरज येमुलवार, सगुणा महा (आशा वर्कर), सुमित्रा बडा (आशा वर्कर),मासू महा (गर्देवाडाचे गाव पाटील), सत्तु दोरपेटी, विनोद दोरपेटी, लालसाई महा, शामराव जोई, तियो महा, रामसु हेडो तसेच CRPF, SRPF, जिल्हा पोलीस व मोठ्या संख्येने महिला-पुरुष उपस्थित होते.