गडचिरोली : युवा वर्गातील टॅलेंटला वाव मिळावा यासाठी गडचिरोलीत पहिल्यांदाच राज्यस्तरीय फॅशन शो आणि मॅाडेलिंग स्पर्धेचे आयोजन सेलिब्रिटी इव्हेन्ट ऑर्गनायजर ज्योती उंदीरवाडे यांनी केले होते. याचे उद्घाटन मंत्री डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण अभिनेत्री आणि बिग बॅास फेम सारा खान यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आ.डॉ देवराव होळी, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, भाजप नेते प्रमोद पिपरे, बी फॅशन प्लाझाचे संचालक मनोज देवकुले, अरुण हर्षे , बलराम सोमनानी, रोहिदास राऊत, मुकेश वाघाडे, छाया कुंभारे, सर्वेश पोपट, वर्षा डोनाडकर, हेमलता वाघाडे, चेतना बटूवार, सुनीता तागवान, ऐश्वर्या नागरीकर, अल्का काशीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. येथील संस्कृती हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ब्राइडल मेकप, मॉडेलिंग, मेहंदी स्पर्धा घेण्यात आली.
मॉडलींग स्पर्धेतील किड गर्लमधून विजेता निरा राकेश नागरे, रनरअप ओवी कपील सीडाम व संप्रेक्षा संज्योत खोब्रागडे, की बॉयमध्ये सार्थक मंगेष मांडलकर, कैवल्य रविद्र धांडे, सक्षम सतीशचंद्र भरडकर, टीन कॅटेगरीमध्ये प्रेम शिंदे, मिस कॅटेगिरी मध्ये पल्लवी मेश्राम, रनरअप रोमा भैसारे, हिमानी बावनकर, मिसेस कॅटेगिरीमध्ये डॉ.प्रियंका शेडमाके, रनर अप सुवर्णलता चत्रेश्वर, नलिनी बोरकर, मिस्टर कॅटेगिरीमध्ये विजेता राज धंदार, रनरअप अतुल तरारे, राजकुमार, मॅनहंट मध्ये विजेता निखिल मून, रनरअप राहूल मेटकर, मंगेश राठोड, कपल कॅटेगिरीमध्ये राणी ढोके विजेता व सुरज ढोके विजेते झाले. ब्राइडल मेकअपमध्ये विजेता योगेश्वरी बारसागडे, रनरअप काजल बासू, ममता गोमस्कार. तसेच मेहंदी स्पर्धेत विजेता अपुर्वा येनुगवार, रनरअप मिताली रॉय आदी विजेते झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील स्पर्धक यात सहभागी झाले होते.
यावेळी जे.टी.एम. स्टार इवेन्ट प्रेजेन्टचे मॉडेल मुख्य बालकलाकार तन्मय उंदिरवाडे, संप्रेषक खोब्रागडे, तसेच मुख्य भूमिकेतील गणेश व्यवहारे यांचा नवीन म्यूझिक अल्बम दाखवण्यात आला.