इंग्रजी आश्रमशाळेचे सात विद्यार्थी राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळणार

विभागीय स्पर्धेत दाखविली चमक

गडचिरोली : क्रीडा व युवक खेळ संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीड़ा अधिकारी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत येथील शासकीय इंग्रजी माध्यमच्या आश्रमशाळेतील 7 खेळाडूंची धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेचे 17 खेळाडू चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे झालेल्या विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शनाची छाप पडणाऱ्या 7 खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कंपाउंड राऊंड, वयोगट 14 वर्षे मुले गटात निकेश हलामी (चतुर्थ), रिकर्व राऊंड 14 वर्षे मुलींच्या गटात प्रितिलता पुजेरी (प्रथम), इंडियन राऊंड 14 वर्षे मुलींच्या गटात सिमरन भोयर (तृतीय), मुस्कान कोला (चतुर्थ), इंडियन राऊंड 19 वर्ष मुलांच्या गटात रुद्र जुमनाके (तृतीय), इंडियन राऊंड 19 वर्षे मुलींच्या गटात ईशा मलिया (चतुर्थ), रिकर्व राऊंड 19 वर्षे मुलांच्या गटात पियूष गावडे (चतुर्थ) यांचा समावेश आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, डॉ.प्रभू सादमवार, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, श्रीराज बदोले, नाजुक उईके, आर्चरी प्रशिक्षण केंद्राचे धनुर्विद्या मार्गदर्शक रोशन सोळंके , हिमालय शेरखी, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, आश्रमशाळा व प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.