संपूर्ण देशभर वीजेचे दर सारखेच ठेवा, खासदार किरसान यांची मागणी

ऊर्जा समितीच्या बैठकीला उपस्थिती

गडचिरोली : दिल्ली येथे ऊर्जा विभागाच्या संसदीय समितीची बैठक विस्तारित संसद भवन सभागृहात पार पाडली. या बैठकीत खासदार डॉ.एन.डी.किरसान यांनी काही मागण्यांकडे समितीचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा झाला पाहिजे, विजेचे दर संपूर्ण देशात एकच असावेत, जेणेकरून महाराष्ट्रातील वीज दर कमी होतील. घरगुती वीज पुरवठ्यात खंड पडू नये, गडचिरोली-गोंदियासारख्या मागास व आदिवासी जिह्यात सोलर तथा हायड्रो वीज निर्मिती व्हावी, शेतकऱ्यांना वीज जोडणी त्वरित मिळावी, सोलर पम्प बसवावेत याबाबत मागणी केली. हे विषय जरी राज्य सरकारच्या अख्त्यारितील असले तरी केंद्राने पॉलिसी ठरवून तसे निर्देश राज्यांना देण्याची सूचना त्यांनी केली.