अहेरीत अम्ब्रिशराव, हनमंतू मडावी तर आरमोरीत गेडाम यांची बंडखोरी कायम

डॅा.होळी, विश्वजित कोवासे यांची माघार

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांचे कोण-कोण बंडखोर माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात गडचिरोलीतून भाजपचे डॅा.देवराव होळी आणि काँग्रेसचे विश्वजित कोवासे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. याशिवाय आरमोरीतून वामन सावसाकडे, माधुरी मडावी यांनी माघार घेतली. मात्र अहेरीत भाजपचे अम्ब्रिशराव आत्राम आणि काँग्रेसचे हनमंतू मडावी तर आरमोरीत काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

भाजपने डॅा.देवराव होळी यांना शांत करताना त्यांना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद बहाल केले. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून एकूण 11 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले. यामुळे आता आरमोरी मतदार संघात 8, गडचिरोलीत 9 आणि अहेरीत 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.

अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये आरमोरी मतदारसंघातून माधुरी मुरारी मडावी, वामन वंगनुजी सावसाकडे, निलेश देवाजी हलामी आणि रमेश गोविंदा मानागडे या चार उमेदवारांचा समावेश आहे. गडचिरोली मतदार संघातून आसाराम गोसाई रायसिडाम, डॉ.देवराव मादगुजी होळी, मोरेश्वर रामचंद्र किनाके, वर्षा अशोक आत्राम, विश्वजीत मारोतराव कोवासे या 5 उमेदवारांनी आणि अहेरी मतदारसंघातून अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम तसेच अजय मलय्या आत्राम या दोन उमेदवारांचा समावेश आहे.

आता निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये आरमोरी विधानसभा मतदार संघात कृष्णा दामाजी गजबे (भारतीय जनता पार्टी), रामदास मळूजी मसराम (इंडियन नॅशनल काँग्रेस), आनंदराव गंगाराम गेडाम (अपक्ष), शिलू प्रविण गंटावार (अपक्ष), मोहनदास गणपत पुराम (वंचित बहुजन आघाडी), चेतन नेवशा काटेंगे (आझाद समाज पार्टी), अनिल तुलाराम केरामी (बहुजन समाज पार्टी), खेमराज वातुजी नेवारे (अपक्ष).

गडचिरोली विधानसभा मतदार संघात मनोहर तुळशिराम पोरेटी (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ.मिलींद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), संजय सुभाष कुमरे (बहुजन समाज पार्टी), जयश्री विजय वेळदा (पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), भरत मंगरुजी येरमे (वंचित बहुजन आघाडी), योगेश बाजीराव कुमरे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), दिवाकर गुलाब पेंदाम (अपक्ष), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे (अपक्ष), डॉ.सोनल चेतन कोवे (अपक्ष)

अहेरी विधानसभा मतदार संघात आत्राम धर्मरावबाबा भगवंतराव (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी), आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), राजे अम्ब्रिशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष), हनमंतु गंगाराम मडावी (अपक्ष), रमेश वेल्ला गावडे (बहुजन समाज पार्टी), संदीप मारोती कोरेत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), निता पेंटाजी तलांडी (प्रहार जनशक्ती पार्टी), आत्राम दीपक मल्लाजी (अपक्ष), कुमरम महेश जयराम (अपक्ष), गेडाम शैलेश बिच्चू (अपक्ष), नितीन कविश्वर पदा (अपक्ष), लेखामी भाग्यश्री मनोहर (अपक्ष) यांचा समावेश आहे.