देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आरमार विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, माजी सभापती तथा तालुका महामंत्री मोहन पाटील गायकवाड, सरपंच कुंदा गायकवाड, उपसरपंच धनंजय तिरपुडे, ऋषी गायकवाड, टिकाराम गायकवाड, माजी उपसरपंच अनिल मस्के, हरी कुथे आदी उपस्थित होते.
खरेदी-विक्री सोसायटी देसाईगंजच्या वतीने हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. या परीसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.