अहेरी : तालुक्यातील कमलापूर येथील एका युवतीचे तिच्या आई-वडीलांसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात किटकनाशक प्राशन करून जीवन संपविले. ही घटना कमलापूर येथे रविवारी सायंकाळी घडली. करुणा पोचमलू निर्ला (20 वर्ष) असे मृत युवतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, करुणाचा घरगुती कारणातून आई-वडिलांसोबत वाद झाला. शब्दाने शब्द वाढत गेल्याने हा वाद नकोसा होऊन आईने मीच विषय पिऊन मरते, असे म्हटले. यादरम्यान करुणा हिने शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी आणलेल्या किटकनाशकातील शिल्लक औषध प्राषण केले.
ही बाब लक्षात येताच तिला आधी कमलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पण वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आणि रुग्णावाहिका दुरूस्तीसाठी गडचिरोलीला पाठविली होती. त्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधिकारी राजेश मानकर यांनी फोनवरून सूचना करत खासगी वाहन उपलब्ध करून दिले. पण अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला.