गडचिरोली : माजी खासदार अशोक नेते यांच्या गडचिरोलीतील जनसंपर्क कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत स्व.मुंडे त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, तालुका महामंत्री बंडू झाडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, रमेश नैताम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जेष्ठ नेते दत्तू माकोडे, श्याम वाढई, भुपेश कुळमेथे, अविनाश विश्रोजवार, केशव निंबोड, लोमेश कुळमेथे, विक्की भुरसे, बंटी खडसे, विनोद सेलोटे, अरूण नैताम, राहुल पोरेड्डीवार, मुन्ना गौतम, आकाश भोयर, राम दूधबावरे, सुभल मिस्त्री, राकेश राचमलवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.