गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त 84 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच 84 वृद्धांना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली, चामोर्शी, सिरोंचा येथे शाळकरी विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे उपाध्यक्ष नईम शेख, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हुसेन साबीर शेख, जिल्हा अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल गण्यारपवार, गडचिरोली तालुकाध्यक्ष मनोहर भोयर, जिल्हा महिला सरचिटणीस विमल भोयर, भास्कर निमजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.