देसाईगंज : तालुक्यातील मौजा गांधीनगर ग्रामपंचायतमधील नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीतून “जल शुध्दीकरण व शितकेंद्र” मंजूर करण्यात आले आहे. या केंद्राचे काम जलदगतीने पूर्ण झाले असून शनिवारी (दि.5 एप्रिल) या जल शुद्धीकरण व शितकेंद्र प्लांटचे लोकार्पण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी, सरपंच सपना धाकडे, सरपंच प्रभा ढोरे, उपरपंच नेताजी सोंदरकर, उपरपंच धनंजय तिरपुडे, ग्राम पंचायत सदस्य रामचंद्र नखाते, चक्रधर बनकर, वैभव मेश्राम, वैष्णवी दोनाडकर, अल्का मोहुर्ले, करिष्मा सौंदरकर, शालू ढवळे, वर्षा चंडीकार तसेच महादेव लेंनगुरे, जयपाल भुरके, देवदत्त धाकडे, बाळकृष्ण तुपटे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.