अहेरी : तालुक्यातील कुरूमपल्ली येथे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या स्थानिक विकास निधीतून बोअरवेल मंजुर करून खोदकामाची सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
खोदकामाची सुरूवात करताना प्रा.रतन दुर्गे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, कुरूमपल्लीचे पाटील बोड्डाजी तलांडी, तसेच सत्यनारायण येगोलोपवार, बंडू दहागावकर, बाजीराव तलांडी, मासा आत्राम, तिरुपती मडावी, योगेश तलांडी, आकाश राऊत यांच्यासह कुरूमपल्ली गावातील नागरीक उपस्थित होते.
