अहेरीच्या इंदिरानगरातील कर्करुग्णाला अम्ब्रिशराव आत्राम यांची आर्थिक मदत

परिस्थितीमुळे घेतले होते अर्धवट उपचार

अहेरी : नगरातील इंदिरानगर बेघर कॉलनी येथील सुरेश आलाम यांना कर्करोगाने ग्रासले, परंतू आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च झेपत नव्हता. अर्धवट उपचार घेऊन त्यांना नागपुरातून परतावे लागले. कुटूंबियांनी त्यांची ही व्यथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव महाराज यांच्यापर्यत पोहोचवली. गोरगरीबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणार्‍या अम्ब्रिशराव आत्राम यांनी लगेच कुटुंबियांना बोलावून घेत आर्थिक मदत दिली. तसेच पुढील उपचाराची व्यवस्था सुध्दा लावून दिली. त्यांच्या या दातृत्वाबद्दल आलाम कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले.