देसाईगंज : शहरातील जुनी वडसा भागातील चव्हाण वार्डात वैशिष्ट्यपूर्ण निधीतून नाट्य सभामंडपाची उभारणी केली जाणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. या नाट्य सभामंडपामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा रसिकांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींसह सर्वांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
भूमिपूजनप्रसंगी भाजपचे देसाईगंज शहराध्यक्ष सचिन खरकाटे, संतोष पत्रे, केशव राऊत, आसाराम पत्रे, अभिमन देवतळे, नरेश पारधी, शोभा पत्रे, आसाराम चौधरी, गजानन खरकाटे, तिलक राऊत, प्रल्हाद राऊत, तातोबा चौधरी, रामकृष्ण पत्रे, मधुकर पत्रे, गजानन बोकडे, मनोहर बोकडे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
नाट्य सभामंडपाच्या बांधकामामुळे नाट्यरसिक तथा गावकऱ्यांना नृत्य, नाटक, खेळ, वेशभूषा स्पर्धा व विविध कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे.