पीक विमा कंपन्यांची 200 कोटींची कमाई, शेतकऱ्यांना केवळ 16 कोटींची भरपाई

गडचिरोली जिल्ह्यात योजना नेमकी कोणासाठी?

गडचिरोली : राज्याच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात धान, अर्थात भात हे मुख्य पीक आहे. सिंचनाची साधनं अपुरी असल्याने आणि पावसाच्या लहरीपणाने दरवर्षी येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. मात्र नुकसानभरपाई मिळेल या आशेने पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपन्यांनी दरवर्षीच पाने पुसली आहेत. गेल्या चार वर्षात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवघ्या 16 कोटींची भरपाई देत विमा कंपन्यांनी तब्बल 200 कोटींची कमाई केल्याचे दिसून येते. या योजनेच्या कार्यपद्धतीचा ‘कटाक्ष’ने केलेला हा पंचनामा. पहा सोबतचा व्हिडिओ वृत्तांत.