गडचिरोली : शासकीय धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यासंदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी गडचिरोलीसह परिसरातील शेतकऱ्यांनी खा.डॉ.नामदेव किरसान यांच्याकडे केली होती. डॉ.किरसान यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांना पत्र लिहून आधारभूत किंमत खरेदी योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
हंगाम 2024-25 मध्ये, केंद्रांवर शेतकऱ्यांकडील धान खरेदीकरीता 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देणारा आदेश काढण्यात आला आहे. खासदार डॉ.किरसान यांच्या मागणीला यश आले असून शासकीय धान खरेदी केंद्रांवर 31 मार्च 2025 पर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने संबंधित यंत्रणांना दिले आहे.
































