ई-पीक नोंदणीला मिळणार मुदतवाढ, आदेश लवकरच

महसूलमंत्र्‍यांच्या भेटीचे फलित

गडचिरोली : ई-पीक नोंदणीसाठी मिळालेल्या मुदतीत अनेक तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपुरात भेट घेऊन धान पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. त्यात ई-पिक नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणीही सांगितल्या. त्यामुळे ई-पिक नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची विनंती आ.मसराम यांनी त्यांच्याकडे केली. मंत्री बावनकुळे यांनी मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली. लवकरच त्याबाबतचा अधिकृत आदेश जारी होणार असल्याचे आ.मसराम यांनी सांगितले.