एटापल्ली : उपविभागातील वनहक्क दावेदारांचे नकाशे आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी लवकरात लवकर करून त्यांची दावे लवकर निकाली काढावे, अशी मागणी माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी केली आहे. एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी नमन गोयल यांची भेट घेऊन त्यांनी या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी गोयल यांनी सांगितले की, वन विभागाकडून जी कागदपत्रे सादर करावी लागतात त्या कागदपत्रांची माहिती आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठवत आहे. वनहक्क दाव्यासाठी पात्र यादी जाहीर झाल्यानंतर संबंधितांना ते पट्टे देण्यात येईल, असे गोयल यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुकाध्यक्ष सांबा हिचामी, अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चारडूके, राजू नरोटे, लक्ष्मण नरोटे, सुरज जाधव, तिरुपती मडावी, सुनील नैताम, आकाश राऊत यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.