गडचिरोली : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गडचिरोली तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धान व मका पीक हातातोंडाशी आले असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्व गावांमधील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी केली आहे.
शेतीसोबतच तालुक्यातील बऱ्याच गावांमधील घरांमध्ये सुध्दा पाणी जावुन जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वांचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी दशमुखे यांनी केली आहे.